दिवाळी
6 दिवसांचा प्रकाश उत्सव
नात्यांना एकत्र आणणारी आणि
घराला समृध्दीने उजळविणारी
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नाही तर सुख समृध्दीचा सोहळा आहे. घरात केवळ दीपच नव्हे तर मने देखील उजळविणारा हा उत्सव आहे.
दारात रांगोळी, घरात तेवत्या पणत्या, खिडकीत आकाशकंदिल, फराळांचा सुगंध दरवळणारी आणि आपल्या माणसांचा सहवास देणारी ही दिवाळी असते आपल्या मनात रेंगाळणारी आणि जीवनाला नवी ऊर्जा देणारी !
चला, जाणून घेऊया दीपावलीच्या 6 दिवसांचा सुंदर प्रवास.
दिवाळीचे 6 दिवस
प्रत्येक दिवस एक वेगळी परंपरा, एक वेगळी भावना आणि आनंदाचा नवा अर्थ घेऊन येतो.

वसुबारस
पूजा सवत्स गोधनाची !

धनत्रयोदशी
पूजा धन्वंतरी व श्री लक्ष्मीची !

नरकचतुर्दशी
पहाट अभ्यंगस्नानाची !

लक्ष्मीपूजन
पूजा श्री लक्ष्मी-कुबेराची !

दिवाळी पाडवा
सण शुभमुहूर्ताचा !

भाऊबीज
गोडवा भाऊबहिणीच्या नात्यातला !
पूजा सवत्स गोधनाची !
आपल्या कृषीप्रधान भारत देशामध्ये गो-वंशाचे महत्त्व खूप मोठे आहे. या गो-वंशामुळेच आपले पोषण होते. गोवंशाबद्दल हीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा सण आपण साजरा करतो.
आरोग्य आणि समृद्धीचा क्षण !
या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. तसेच घरात सुखसमृद्धी येण्यासाठी श्री लक्ष्मीचीही पूजा करण्यात येते.
— पूजा साहित्य व विधी —
धने, गूळ, तांदूळ, नवीन नाणी किंवा दागिने, निरांजन-समई, हळद-कुंकू, फुले. सायंकाळी घराच्या मुख्य दारासमोर व तुळशीजवळ दिवे प्रज्वलित करून लक्ष्मी-धन्वंतरीची आरती करावी
पहाट अभ्यंगस्नानाची !
पूजा श्री लक्ष्मी-कुबेराची !
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस. संध्याकाळी श्री लक्ष्मी व कुबेर यांची पूजा केली जाते घरात समृद्धी व ऐश्वर्य नांदावे यासाठी. व्यापारी वर्गासाठी हा दिवस विशेष असतो; नवीन हिशोब वहीचे पूजन (वही पूजन) करुन नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात केली जाते.
— पूजा साहित्य व विधी —
लक्ष्मी-गणेश मूर्ती किंवा प्रतिमा, कमळ व झेंडूची फुले, धने-गूळ, सोने-नाणे, चौरंगावर रांगोळी सजावट, निरांजन, नैवेद्य, चौरंगावर मूर्तीची स्थापना करुन षोडशोपचार पूजा व आरती करावी.
सण शुभमुहूर्ताचा !
हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहावा लागत नाही. व्यापारी वर्गासाठी हा नव्या आर्थिक वर्षाचा (विक्रम संवत) प्रारंभ मानला जातो. बलिप्रतिपदा म्हणूनही हा दिवस ओळखला जातो, ज्यात राजा बळीच्या औदार्याचे स्मरण केले जाते.
गोडवा भाऊबहिणीच्या नात्यातला !
यमराज व यमुनेच्या भेटीची कथा या सणामागे सांगितली जाते यमुनेने भावाचे औक्षण करून त्याचे स्वागत केले, तेव्हापासून बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा होतो.

सहा दिवसांचा हा दीपोत्सव अखेर नात्यांमधील प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेने पूर्णत्वास जातो.
दिवाळीच्या खास परंपरा
रेसिपी