घरी पाहुणा म्हणून येऊन रहाणारा एकमेव देव म्हणजे श्रीगणपती ! हा बाप्पा आबालवृध्दांचा लाडका आहे. ही जशी बुध्दीची देवता आहे तसाच तो विघ्नहर्ताही आहे. या लाडक्या देवाचा पाहुणचार यथासांग व्हावा आणि देवाने प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात या भावनेतूनच अत्यंत श्रध्देनं केलं जाणारं हे श्रीगणेशव्रत !
श्रीगणपतीचे आगमन मंगलदायी व्हावे. पूजाअर्चा आणि उपचार शास्त्रोक्त व्हावेत आणि लाडक्या देवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यावेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा कशी करावी, हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पीडीएफ डाऊनलोड करा.
आपल्याकडे पार्थिव गणेश व्रत सांगितलेले आहे.
पार्थिव म्हणजे पृथ्वी. अर्थात माती.
त्यामुळेच मातीची मूर्ती ही गणेशतत्वाला अधिक आकर्षित करणारी आहे असे शास्त्र सांगते.
पण मूर्ती कोणतीही असो, भाव महत्वाचा.
तेव्हा भक्तीभावाने म्हणूया, गणपती बाप्पा मोरया !
आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याच्या आवडीचा पदार्थ आपण करतो.
तसाच गणपतीच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक.
आणि मोदक म्हणजे मोद अर्थात आनंद देणारा.
तो काही ठिकाणी लाडू असतो तर आपल्याकडे मोदक.
तेव्हा तुम्हीही घरात प्रेमाने मोदक बनवा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला खाऊ घाला.
घरी आलेल्या पाहुण्याला आपण उभे ठेवू की रिलॅक्स बसा म्हणू?
जर देव आपल्याकडे येतोय तर आसनस्थ असावा.
त्यातही एक पाय सोडलेला असावा आणि उजवा पाय दुमडलेला असावा असं शास्त्र सांगतं.
आणि बाप्पाचं हेच तर रिलॅक्स रूप, जे बघून आपल्यालाही प्रसन्न वाटतं. होय ना?
गणपतीबाप्पा हा सर्व मनोकामना पूर्ण करणारा देव आहे.
जे मागेल ते तो देईल. पण ते माझ्या हिताचे आहे की नाही,
हे आपल्या कुठे ठाऊक?
त्यासाठीच बाप्पासमोर हात जोडून म्हणावं की, हे जे मी मागतो ते माझ्या हिताचं असेल तरच द्यावे.
कारण आपली काळजी त्या देवालाच अधिक आहे. आणि तो आपलं कल्याणच करणारा आहे.
श्रीगणेशाचा वर्ण शेंदरी किंवा लाल मानला जातो.
त्यामुळे लाल रंगांच्या वस्तूंकडे गणेशतत्व आकर्षित होते.
लाल जास्वंदांच्या फुले ऊर्जा, उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे लाल जास्वंदाची फुले आवर्जून व्हावी आणि बाप्पांची ऊर्जा अनुभवावी.
7:00 AM
7:00 PM
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषिपंचमीचे व्रत केले जाते. सप्तर्षींची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या व्रताचा गाभा आहे. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सात ऋषी. त्यांच्यासोबत वसिष्ठपत्नी अरुंधतीचीही पूजा केली जाते.
ज्ञान, संस्कृती आणि परंपरा या ऋषींमुळे टिकली त्यांचे ऋण फेडता येत नाही, पण वर्षातून एकदा तरी त्याची जाणीव ठेवावी, ही या व्रतामागची भावना. म्हणून याला “ऋषी ऋण“ स्मरण्याचे व्रतही म्हटले जाते.
हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात. दिवसभर उपवास, आघाड्याने स्नान आणि नांगर न लागलेल्या जमिनीतील भाजी या तीन गोष्टी या व्रताचे वैशिष्ट्य आहेत.
The heart of the celebration is the daily aarti — a small ritual of light, song and gratitude performed both morning and evening in front of Ganpati.